Join us

'सीतेची भूमिका करते अन् अंगप्रदर्शन करतेस '?; बिकिनी परिधान केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:29 IST

Shivya pathania : अलिकडेच शिव्याने बिकिनी परिधान करुन समुद्र किनारी फोटोशूट केलं.ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिव्या पठानिया (Shivya Pathania) सध्या बाल शिव आणि राम सिया के लव कुश या टिव्ही मालिकांमुळे ओळखली जाते. या दोन्ही मालिकांमध्ये ती पार्वती आणि सीता या पौराणिक भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता अफाट आहे. परंतु, तिच्या एका कृतीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अलिकडेच शिव्याने बिकिनी परिधान करुन समुद्र किनारी फोटोशूट केलं.ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

अलिकडेच शिव्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ''तू  पार्वती, सीता अशा महान,पवित्र स्त्रियांची भूमिका साकारतेस आणि बिकिनीसारखे अंगप्रदर्शन करणारे कपडे कसे काय घालतेस?'' असा प्रश्न विचारत तिला ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगवर शिव्याने प्रत्युत्तर दिलं आहे.

शिव्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या ट्रोलिंगवर भाष्य करत तिचं मत मांडलं आहे. “ गेल्या अनेक वर्षांपासून मी अभिनय करतीये, लोक माझ्या भूमिकांमुळे माझ्यासी जोडले गेले आहेत. पण, मी कायम वेगवेगळ्या फॅशनचे कपडे परिधान करते. आणि, लहानपणापासून मला फॅशन, मेकअप या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. मात्र, ज्यावेळी मी बिकिनीमधील माझे फोटो पोस्ट केले. त्यावेळी लोकांनी निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली. पण, काही लोकांनी पॉझिटिव्ह कमेंटदेखील केलीये", असं शिव्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, "अनेक जणांनी मला असे कपडे न घालण्याचा सल्ला दिला. आता मी कोणते कपडे घालायचे, कोणते नाही हे लोकं सांगू लागले आहेत. पण, बीचवर बिकिनी परिधान करणं ही कॉमन गोष्ट नाहीये का?  मला सगळ्यांच्या मताचा आदर आहे. पण, कपड्यांवरुन माझी ओळख निर्माण होत नाही. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना कळतं. शिव्याने पौराणिक मालिकांविषय़ीदेखील भाष्य केलं. मला पौराणिक आणि इतर मालिका दोघांमध्ये सारखंच प्रेम मिळालं." 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी