Join us

"ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री"; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:20 IST

Thod tuz ani thod maz: गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची फक्त नेटकऱ्यांमध्ये चर्चा होती. अखेर या मालिकेचा प्रोमो समोर आला.

छोट्या पडद्यावर सध्या असंख्य मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात अनेक मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या अभिनेत्री शिवानी सुर्वे (shivani surve) आणि समीर परांजपे (sameer pranjape)  यांच्या नव्या मालिकेची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून चाहत्यांना हा प्रोमो प्रचंड आवडला आहे.

शिवानी आणि समीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ही जोडी  ‘थोडं तुझं आणि थोडं माझं' या नव्या मालिकेत झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची फक्त नेटकऱ्यांमध्ये चर्चा होती. अखेर या मालिकेचा प्रोमो समोर आला. हा प्रोमो नेटकऱ्यांना भलताच आवडला असून सगळ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

''मस्त प्रोमो, slient आणि silence अभिनय...gossip नाही, vilence नाही, पात्रांची चढाओढ नाही..", असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, "अरे व्वा..ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री" , "अतियश युनिक आणि मस्त प्रोमो", "याला म्हणतात प्रोमो", "छान आहे प्रोमो", अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी या मालिकेचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ही मालिका प्रसारित होण्यापूर्वीच लोकप्रिय ठरत असल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारशिवानी सुर्वेमराठी अभिनेता