Join us

'जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता..'; आकांक्षा पुरीला डेट करण्याविषयी शिव ठाकरेने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:35 IST

Shiv thakare: अनेक कार्यक्रमांमध्ये शिव आणि आकांक्षा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या

बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv thakare). मराठीसह हिंदी बिग बॉसमध्येही त्याने आपली छाप पाडली. त्यामुळे आता हिंदी कलाविश्वातही त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एकेकाळी अभिनेत्री वीणा जगतापमुळे चर्चेत आलेला शिव यावेळी आकांक्षा पुरीमुळे चर्चेत आला आहे. शिव आकांक्षाला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. यावर आता त्याने मौन सोडलं आहे.

वीणा जगतापसोबत (VEENA JAGTAP) ब्रेकअप झाल्यानंतर शिव बिग बॉस फेम निमृतकौर अहलुवालिया हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या चर्चा थांबत नाहीत तोच आता त्याचं नाव आकांक्षा पुरीसोबत जोडलं जात आहे. या चर्चांवर त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. 

"मला अफवा निर्माण झालेला शिव ठाकरे व्हायचं नाहीये. मला माझ्या आयुष्यात एक सामान्य व्यक्ती हवीये, जिला प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची गरज भासणार नाही. प्रेम किंवा एखादं नातं एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बेळ घालवावा लागतो. त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करता. सध्या माझं लक्ष फक्त खतरों के खिलाडीवर आहे. आता मला काम मिळालंय आणि इथे येण्यासाठी मला खूप वर्ष लागली आहेत. पण, एक दिवस असा येईल जेव्हा मला योग्य जोडीदार मिळेल आणि त्यासाठी मला कोणत्याही दिखाव्याची गरज भासणार नाही", असं उत्तर शिवने दिलं.

दरम्यान, अनेक कार्यक्रमांमध्ये शिव आणि आकांक्षा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शिवने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. बिग बॉसनंतर आता शिव खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :शीव ठाकरेवीणा जगतापबिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजन