Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव ठाकरेचा नवीन शो, रुबिना दिलैक अन् 'मंडली' सोबत पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 09:03 IST

फोटोंमध्ये शिवठाकरे तसंच तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम आणि सुंबूलही दिसत आहे. बिग बॉसची 'मंडली' परत आली आहे. 

महाराष्ट्राची शान शिव ठाकरे (Shiv Thakare) लवकरच नव्या शो मधून चाहत्यांच्या भेटीला येतोय. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैकने इन्स्टाग्रामवर शोमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शिवठाकरे तसंच तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम आणि सुंबूलही दिसत आहे. बिग बॉसची 'मंडली' परत आली आहे. 

रुबिनाने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तिच्यासोबत हर्ष लिंबाचिया, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आहे. तिघेही काहीतरी टास्क करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत शिव ठाकरे आणि अर्चना गौतम उभे आहेत तर रुबिना दिलैक मध्ये बसली आहे. समोर हर्ष आणि पुनित पाठक उभे आहेत. चौघांमध्ये काहीतरी वाद होताना दिसतोय. 'इमोशनल डॅमेज' असं मोठ्या अक्षरात मागे लिहिलेलं आहे. नवीन शोचा हा सेट दिसतोय. 

रुबिकाने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ही टॉर्चरची वेळ आहे.(विनोदासह). सोमवार ते रविवार रात्री १० वाजता कलर्सवर हा नवा शो येतोय. नेमका शोचा फॉर्मॅट काय हे अजून समोर आलेले नाही. तरी शिवच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

टॅग्स :शीव ठाकरेटिव्ही कलाकार