Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव वीणाला सांगतोय, आर या अद्याक्षरापासून नावाची सुरुवात होणारी घरातील ही सदस्य आहे माझ्यासाठी खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 18:28 IST

वीणा आणि शिव यांच्या आयुष्यातील वीक पॉईंट कोण आहेत हे ते दोघे बिग बॉसच्या घरात शेअर करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देआर वरून नावाची सुरुवात होणारी व्यक्ती माझ्यासाठी वीक पॉईंट आहे. आर म्हणजे रूपाली का असे विचारल्यावर शिव लगेचच म्‍हणतो की, ''राणी!''. जे वीणाचे टोपण नाव आहे.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. 

गेल्‍या 'वीकेण्‍डचा डाव' एपिसोडमध्‍ये महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना चांगलेच सुनावल्यानंतर आता हे स्‍पर्धक त्‍यांच्‍यामधील कमकुवत बाजूंचे आत्‍मनिरीक्षण करू लागले आहेत. पण यात प्रेमात आकंठ बुडालेले वीणा आणि शिव आपल्या कमकुवत बाजूंबाबत बोलताना एकमेकांच्या प्रेमात ते किती बुडले आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वीणा शिवच्या डोक्याला 'तेल मालिश' करताना दिसत आहे आणि तेव्‍हाच अभिजीत त्‍यांच्‍याबाबत बोलायला सुरुवात करताना दिसत आहे. 

शिवच्‍या डोक्‍याची मालिश करणारी वीणा म्‍हणतेय की, ''महेश सर त्‍या दिवशी बोललेच ना की, प्रत्‍येकात एक वीक पॉइण्‍ट असतो. पण तुमच्‍यापैकी कोणीही वीक आहे असं नाहीये.'' ती हे बोलतच अभिजीत केळकरकडे जाते आणि म्‍हणते, ''तुला माहीत आहे का रे, माझा वीक पॉइण्‍ट?'' याबाबत तो म्हणतो, ''हो मला माहीत आहे. त्या उत्तराचा पहिला शब्द 'एस' वरून आहे!''

 

अभिजीतचे हे बोलणे ऐकून वीणा लगेचच म्‍हणते, ''बरोबर आणि दुसरं अक्षर 'टी'वरून, म्‍हणजे अक्‍खा टी!'' हे बोलता बोलता ती अ‍गदी गोंडसपणे शिवचे गाल ओढले. त्‍यानंतर अभिजीत तोच प्रश्‍न शिवला विचारतो तर तो म्‍हणतो, त्या व्‍यक्‍तीचे नाव 'आर' वरून सुरू होते. वीणा आणि अभिजीत हे ऐकल्‍यानंतर अचंबित होतात आणि 'आर' बाबत त्याला विचारू लागतात. त्‍याचा अर्थ म्‍हणजे रूपाली का असेच ते विचारतात त्यावर शिव लगेचच म्‍हणतो ''राणी!'', जे वीणाचे टोपण नाव आहे. त्यावर शिव वीणाची टर खेचत म्हणतो, ''एच वरून म्‍हटलं असतं तर तू माझा जीवच गेला असता... 

शिव एच म्हणजे कोणावरून बोलला हे तुम्हाला नक्कीच कळले असेल. कारण हिना आणि त्याच्या मैत्रीची देखील बिग बॉसच्या घरात चांगलीच चर्चा झाली होती. 

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरेवीणा जगतापअभिजीत केळकर