Shehnaaz Gill Hospital Video Viral: ओटीटी आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिलबद्दल एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. शहनाज गिलला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ती रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली आहे. अद्याप अभिनेत्रीकडून याविषयी कोणीतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. मात्र, तिचा जवळचा मित्र 'बिग बॉस १८' चा विजेता करण वीर मेहरानं अभिनेत्रीचा हा व्हिडीओ शेअर केला.
करण वीर मेहरानं शहनाज गिलची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याचा व्हिडीओ त्यानं शेअर केलाय. ज्यात शहनाज ही रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसतेय. तिच्या हाताला ड्रिप लावलेली आहे आणि तिच्या हातावर बँडेजदेखील लावलेलं आहे. हे दृश्य पाहून अनेक चाहते चिंता व्यक्त करत आहेत. शहनाजचं रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने, सोशल मीडियावर तिच्या तब्येतीबाबत चर्चा रंगली आहे. चाहते ती लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
या व्हिडिओत करण शहनाजबद्दल म्हणतो, "मी इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करा, ही मुलगी पूर्ण उर्जेसह लवकरात लवकर बरी व्हावी". यानंतर तो हसत हसत पुढे म्हणतो, "पहा हिला... बिचारीला काय झालंय? हे बघा!" करणच्या या बोलण्यावर शहनाज हसत चेहरा लपवताना दिसते. ती म्हणते, "हा मला हसवतोय". दरम्यान, शहनाज गिलने 'बिग बॉस'मधून लोकप्रियता मिळवली असून, ती 'किसी का भाई किसी की जान' या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. सध्या ती तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'एक कुडी'मुळे चर्चेत आहे.