Join us

डोळ्यात अश्रू अन् थरथरणारे हात; शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पतीची झालीये अशी अवस्था, व्हिडीओ viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:57 IST

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पतीची झालीये वाईट अवस्था, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक

Shefali Jariwala Passed Away :  'कांटा लगा' फेम अभिनेत्री, शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. काल २६ जूनच्या रात्री शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यांनी यांनी तिला रुग्णालयात नेलं, परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होत. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अशातच सोशल मीडियावर शेफालीचे पतीपराग त्यागीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ समोर आला आहे. 

सध्या सोशल मीडियावर पराग त्यागी हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो गाडीमध्ये बसलेला दिसतो आहे. पत्नीच्या निधनाने पराग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. डोळ्यात अश्रू आणि थरथरणारे हात अशा अवस्थेत तो पाहायला मिळतो आहे. पत्नी शेफालीचं जाण्याने रडून रडून त्याची अवस्था वाईट झाली आहे. 

दरम्यान, शेफाली जरीवालाच्यामृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. वयाच्या  ४२ व्या वर्षी शेफालीच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. अभिनेता अली गोनी, मिका सिंग, राजीव अदातिया, काम्या पंजाबी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. 

शेफाली जरीवालाची दोन लग्न झाली आहेत. २००४ मध्ये तिचं पहिलं लग्न मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झालं होतं, परंतु, काही कारणास्तव त्यांचं नातं टिकू शकलं नाही. त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. २००२ मध्ये 'कांटा लगा' या अल्बममधील गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यानेअक्षरश तरुणाईला वेड लावलं होता. शिवाय त्या गाण्यातील शेफालीचा हटके अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरला होता.  

टॅग्स :शेफाली जरीवालाटेलिव्हिजनसेलिब्रिटीमृत्यू