Join us

पोटच्या लेकीच्या निधनाचं दु:ख सहन होईना; शेफाली जरीवालाच्या आईला अश्रू अनावर, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:52 IST

VIDEO: शेफाली जरीवालाच्या निधनाचा आईला बसला धक्का, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी 

Shefali Jariwala Death: टीव्ही इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांना अगदी अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. त्यापैकी एक म्हणजे शेफाली जरीवाला. दरम्यान, काल २७ जूनच्या रात्री अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनाने संपूर्ण परिवारावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. याचदरम्यान, अभिनेत्रीची आई सुनीता यांचा रुग्णालयाबाहेरील एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

शेफालीच्या निधनाची बातमी ऐकताच तिच्या आईच्या मनावर मोठा आघात झाला आहे. पोटच्या लेकीच्या निधानाचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, शेफालीच्या आई गाडीत बसून प्रचंड रडत होत्या. त्याचवेळी गाडीत बसलेले अन्य नातेवाईक शेफालीच्या आईला धीर दिसताना दिसत आहेत. त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत. काल मध्यरात्री शेफाली जरीवालाला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा वाटेत मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटी शेफालीच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :शेफाली जरीवालाटिव्ही कलाकारमृत्यूहृदयविकाराचा झटका