शशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. शशांकला आपण विविध मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. शशांक आसपास घडणाऱ्या विविध सामाजिक, राजकीय घटनांवर त्याचं मत व्यक्त करत असतो. शशांक ज्या प्रश्नांवर आवाज उठवतो त्याबद्दल त्याचे चाहतेही चर्चेत असतात. अशातच शशांकने एका नवीन मुद्द्यावर आवाज उठवला आहे. पोलिसांच्या गाड्यांना चलान लागतं का? असा प्रश्न त्याने सर्वांना विचारला असून एक व्हिडीओ शेअर केलाय.
शशांकने एका पोलीस व्हॅनचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन शशांक लिहितो की, "माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतोय! शासकीय गाड्यांना, police vans ना चलान लागतं का? आणि लागलं तर ते भरलं जातं का? त्यांनी signal मोडला तर चालतं का? माननीय गडकरी साहेबांच्याच गाडीला एकदा चलान भरावं लागल्याचं मी ऐकलं आहे पण सरसकट सगळ्या नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं का???"