अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा करताना दिसतो. कधी शशांक केतकर आसपासच्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवताना दिसतो. तर कधी तो इंडस्ट्रीतील दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आणतो. अशातच शशांक केतकरने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानधन न मिळाल्याच्या मुद्द्यावर शशांकने आवाज उठवला आहे. काय म्हणाला शशांक?शशांकने व्यक्त केला तीव्र संताप
शशांकने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, ''५ वर्ष होऊन गेली. मागची ५ वर्ष आणि ८ october २०२५ पासून पुन्हा contact establish झाल्यामुळे तेव्हा पासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता. अजून एक तारीख दिली आहे त्याने उद्याची ( ५ जानेवारी २०२६ ) full payment जमा झाले नाही तर एक detailed video post करेन… सगळ्या कुंडली सकट. आणि payment झाले तर.. तसाही payment झाल्याचा video पण post करेन.''
अशाप्रकारे शशांकने त्याचा संताप व्यक्त केला आहे. आता शशांकचा ही पोस्ट नेमकी कोणाबद्दल आहे, याबद्दल माहिती कळू शकली नाही. शशांकने कोणाचंही नाव यात घेतलं नसलं तरीही ही पोस्ट नेमकी कोणाबद्दल आहे, याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. शशांक उद्या याविषयी सविस्तर व्हिडीओ पोस्ट करणार आहे. त्यामुळे शशांकच्या चाहत्यांना उद्याच्या व्हिडीओची उत्सुकता आहे. शशांक सध्या 'मुरांबा' मालिकेत काम करत असून अलीकडेच तो 'कैरी' सिनेमात दिसला.
Web Summary : Actor Shashank Ketkar expresses anger over unpaid dues from a producer for five years. He threatens to reveal details if payment isn't received by January 5, 2026.
Web Summary : अभिनेता शशांक केतकर ने पांच साल से निर्माता द्वारा बकाया भुगतान पर गुस्सा व्यक्त किया। उन्होंने 5 जनवरी, 2026 तक भुगतान न मिलने पर विवरण प्रकट करने की धमकी दी।