Join us
Daily Top 2Weekly Top 5

Muramba : ‘हिला हाकलून द्या रे’...! मुरांबा मालिकेतील नवा ट्रॅक पाहून संतापले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:54 IST

Muramba : मुरांबा मालिकेत अनपेक्षित वळणं आलं आहे. ते प्रेक्षकांना आवडलं नाही. मग अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

छोट्या पडद्यावरच्या मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. पण अनेकदा मालिका ट्रोलही होतात. अनेकदा मालिकेतील बदल, मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडत नाहीत आणि मग मालिका ट्रोल होतात. सध्या अशीच एक मालिका ट्रोल होतेय. मुरांबा मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.

‘मुरांबा’ या मालिकेमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) आणि निशानी बोरूले (Nishani Borule) मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेत  शशांक केतकर अक्षयची भूमिका साकारतोय शिवानी मुंढेकर रमा तर निशानी रेवाची भूमिका साकारतेय.  प्रतिमा कुलकर्णी, सुलेखा तलवलकर, शाश्वती पिंपळीकर, विश्वास नवरे, आशिष जोशी, आशुतोष वाडेकर, प्रतीक निकम, श्वेता कामात, राजश्री परुळेकर, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे यासारख्या कलाकारांच्या भूमिका देखील या मालिकेत आपल्याला दिसत आहेत.मुरांबा ही मालिका ट्रायअँगल लव्ह स्टोरी आहे. पण तूर्तास मालिका ट्रोल होतेय. कारण आहे रेवा.

मुरांबा मालिका आता एका उत्कांठावर्धक वळणावर आली आहे. अक्षय आणि रमा यांच्यातील प्रेमाचा आबंट गोड मुरांबा आतो मुरतोय. सुरुवातील रमाच्या बाबतीत कठोर असणारा अक्षय हा आता मात्र तिच्या बाबतीत काहीसा हळवा झाला आहे आणि तिचा विचार देखील करू लागला आहे.

दोघांमधील प्रेम बहरत असाताना अचानक रेवाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अक्षय आणि रमाच्या नात्यात पुन्हा दुरावा आला आहे. याच कारणामुळे प्रेक्षक भडकले आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षक संतापले आहे. रेवाला मालिकेतून हाकलून द्या अशी मागणी करतायेत. तर अनेकांनी ही मालिकेची कथा आता भरकटली आहे असे म्हटलं आहे.  

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकार