Join us
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडच्या बीचवर पतीसह रोमँटिक झाली शर्मिष्ठा राऊत, 'कहो ना प्यार है' गाण्यावर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:47 IST

शर्मिष्ठा तिचा पतीबरोबर थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. थायलंडच्या समुद्रकिनारी शर्मिष्ठाने एक रील व्हिडिओ बनवला आहे.

शर्मिष्ठा राऊत ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून शर्मिष्ठाने कलाविश्वात तिचा जम बसवला. कधी गंभीर तर कधी खलनायिका अशा सगळ्याच मालिका शर्मिष्ठाने उत्तमरित्या वठवल्या. शर्मिष्ठा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. 

सध्या शर्मिष्ठा तिचा पती तेजस देसाईबरोबर थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. थायलंडच्या समुद्रकिनारी शर्मिष्ठाने एक रील व्हिडिओ बनवला आहे. इन्स्टाग्रामवरुन शर्मिष्ठाने हा रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती 'कहो ना प्यार है' या ऋतिक रोशनच्या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शर्मिष्ठाबरोबर तिचा पतीही रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शर्मिष्ठाच्या या रोमँटिक व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "कहानी थोडी फिल्मी आहे काय करणार बॉलीवूड प्रेम काही जात नाही", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. 

दरम्यान, जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे शर्मिष्ठा घराघरात पोहोचली. तिने 'उंच माझा झोका', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'सारं काही तिच्यासाठी', 'अबोली', 'मुलगी झाली हो' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'नाच गं घुमा', 'चि व चिसौका', 'योद्धा' या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना ती दिसली. अभिनेत्रीबरोबरच शर्मिष्ठा एक यशस्वी निर्मातीदेखील आहे. अनेक मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीची बाजू तिने सांभाळली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी