Join us

Sharad Ponkshe: राष्ट्राय स्वाहा!!! शरद पोंक्षे दिसणार आता नव्या भूमिकेत; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:26 IST

Sharad Ponkshe: सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत शरद पोंक्षे आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती देताना दिसत आहेत.

मुंबई: काही महिन्यांपूर्वी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला धीराने आणि धाडसाने तोंड देत पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली आहे.  शरद पोंक्षे यांचा चाहता वर्ग मोठा असून, आता ते नेमक्या कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. 

शरद पोंक्षे यांनी अनेक मराठी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट असो, नाटक असो अथवा मालिका. या तिन्ही माध्यमांतून शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला असून, स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती देताना दिसत आहेत. 

नवीन काहीतरी घेऊन येतोय

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात की, नमस्कार, आजपर्यंत तुम्ही मला अभिनेता म्हणून पाहिले आहे. दिग्दर्शक, निर्माता... माझी विविध भाषणे ऐकली आहेत. पण एक सुजाण नागरिक म्हणून त्याही पलीकडे जाऊन एका वेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावेसे वाटतेय. ते काय आहे.. लवकरच घेऊन येतोय. राष्ट्राय स्वाहा, असे शरद पोंक्षे यांनी सूचित केले आहे. 

दरम्यान, शरद पोंक्षे आताच्या घडीला स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकातील भूमिका प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली होती. याशिवाय अनेक चित्रपट, मालिकांमधून शरद पोंक्षे यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

टॅग्स :शरद पोंक्षेटेलिव्हिजनसेलिब्रिटी