Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शाका लाका बूम बूम' फेम संजू झाला बाबा;किंशुक वैद्यच्या घरी चिमुकल्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:52 IST

Kinshuk vaidya: बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा संजू आता खऱ्या आयुष्यात एका चिमुकल्याचा बाबा झाला आहे.

एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'शाका लाका बूम बूम'. आजही या मालिकेची ९० च्या मुलांमध्ये क्रेझ आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेला संजू अर्थात अभिनेता किंशुक वैद्य  (kinshuk vaidya) याने नुकतीच एक गूडन्यूज दिली आहे. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा संजू आता खऱ्या आयुष्यात एका चिमुकल्याचा बाबा झाला आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेल्या किंशुकच्या घरी एका लहानग्या बाळाच आगमन झालं आहे. किंशुकची पत्नी  दीक्षा नागपाल हिने ८ मार्च २०२६ रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. किंशुक आणि दीक्षा पुत्ररत्न प्राप्त झालं असून त्यांनी ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

किंशुक आणि दीक्षा यांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. अलिबाग येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी २२ नोव्हेंबरला साताजन्माच्या गाठी बांधल्या. किंशुकने 'शाका लाका बूम बूम' व्यतिरिक्त 'जात ना पूछो प्रेम की', 'एक रिश्ता साझेदारी का' आणि 'कर्ण संगिनी' या मालिकांमध्येही काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Shaka Laka Boom Boom' fame Kinshuk Vaidya becomes a father!

Web Summary : Kinshuk Vaidya, known as Sanju from 'Shaka Laka Boom Boom,' and his wife, Diksha Nagpal, welcomed a baby boy on March 8, 2026. The couple shared the good news on social media after marrying in 2024.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार