Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शाका लाका बूम बूम'मधील रितू आठवतेय का? २६ वर्षांनंतर आता ओळखणंही कठीण, सध्या काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:46 IST

'शाका लाका बूम बूम' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती.

'शाका लाका बूम बूम' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रत्येक लहानग्याला 'शाका लाका बूम बूम'ची पेन्सिल आपल्याकडेही असावी असं वाटायचं. 'शाका लाका बूम बूम' या मालिकेतील संजू आणि करुणा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, या मालिकेत गुंडांशी दोन हात करणारी टॉमबॉय मुलगी 'रितू' आठवतेय का? हे पात्र साकारणारी बालकलाकार सैनी राज आता २६ वर्षांनंतर पूर्णपणे बदलली आहे.

सैनी राजनं अभिनय सोडून वेगळा मार्ग निवडला. आज ती केवळ चाइल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून नव्हे, तर कवयित्री, लेखिका, गीतकार आणि वर्च्युअल बुक क्लबची संस्थापक म्हणून ओळखली जाते.  शाहरुख खानने गायलेल्या 'सब सही हो जाएगा' या गाण्याचे गीतलेखन तिने केले. प्रसिद्ध रॅपर बादशाहसोबतही तिने काम केले आहे. नसीरुद्दीन शाह अभिनित 'इंट. कॅफे नाईट' या लघुपटाचे लेखन तिने केले आहे. तसेच नेटफ्लिक्सच्या 'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर'मध्येही ती झळकली आहे.

एका पॉडकास्टमध्ये सैनीने सांगितले की, टीव्हीवर लोकप्रिय चेहरा असूनही, जाहिरातींसाठी तिने जवळपास ३०० वेळा ऑडिशन दिली, पण प्रत्येक वेळी तिला नाकारण्यात आले. सैनी म्हणाली, "ते म्हणायचे की आम्हाला गोरी मुलगी हवी आहे. मी सावळी आणि गुबगुबीत होते. मात्र, माझ्या आई-वडिलांनी मला मी जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचा विश्वास दिला, ज्यामुळे मला कधीही न्यूनगंड वाटला नाही".

'शाका लाका बूम बूम' मालिकेत हंसिका मोटवानी (करुणा) ही 'सुंदर आणि गोड' मुलगी होती, तर सैनी एक 'टॉमबॉय' होती. सैनी सांगते, "हंसिका त्याकाळी सौंदर्याचं प्रतीक मानली जायची. पण मला तिची कधीच असूया वाटली नाही. मी मुलांना मारणारी मुलगी होते आणि मला त्यात आनंद मिळायचा. शाळेतही माझे मित्र जास्त होते आणि मुली माझा तिरस्कार करायच्या".

English
हिंदी सारांश
Web Title : 'Shaka Laka Boom Boom's' Ritu: Then and Now Transformation

Web Summary : Remember Ritu from 'Shaka Laka Boom Boom'? Actress Saini Raj, now 26, pursued writing and poetry after facing rejection in auditions due to her complexion. She's penned lyrics for songs with Badshah and even worked with Naseeruddin Shah.
टॅग्स :टिव्ही कलाकार