कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल रवी दुबे आणि सरगुन मेहता त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. रवी आणि सरगुन आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १२ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे. तर ३७व्या वर्षी सरगुन आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर आता सरगुनने मौन सोडत पोस्ट शेअर केली आहे.
सरगुनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने ती गरोदर नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "आमच्या प्रेग्नंसीची बातमी आमच्या आधीच सर्वांना कळते. गेल्या २ वर्षांपासून हे सुरू आहे. त्यांच्या नुसार, मी गरोदर आहे. इतकी मोठी प्रेग्नंसी! कृपया करून या तथ्य नसलेल्या बातम्या देऊ नका. गोष्टीची खातरजमा करायला किंवा आमच्याशी संपर्क साधून खात्री करून घ्यायला असा कितीसा वेळ लागतो", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत सरगुनने प्रेग्नंट नसल्याचं आणि ते आईबाबा होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
रवी आणि सरगुन हे हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय कपल असून त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची ओळख एका मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच ते प्रेमात पडले होते. ७ डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी लग्न करत संसार थाटला. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत.
Web Summary : Actress Sargun Mehta addresses pregnancy rumors, clarifying she isn't pregnant. She expressed frustration with the recurring false reports, which have been circulating for two years. She urged media outlets to verify information before publishing.
Web Summary : अभिनेत्री सरगुन मेहता ने गर्भावस्था की अफवाहों को संबोधित करते हुए स्पष्ट किया कि वह गर्भवती नहीं हैं। उन्होंने बार-बार आने वाली झूठी खबरों पर निराशा व्यक्त की, जो दो साल से चल रही हैं। उन्होंने मीडिया से प्रकाशन से पहले जानकारी सत्यापित करने का आग्रह किया।