Join us

सारेगमप लिटिल चॅम्प्स: कोपरगावची गौरी ठरली महाविजेती; बक्षीस स्वरुपात मिळाली 'ही' मौल्यवान वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 09:46 IST

Sa re ga ma pa Little Champs: श्रावणी वागळे आणि जयेश वागळे ठरले उपविजेता

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना आणि परिक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यामुळे ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या ६ स्पर्धकांपैकी नेमकी बाजी कोण मारणार आणि यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या गौरी अलका पगारे हिने बाजी मारली आहे. 

यंदा सा रे ग म प लिटिल चॅम्प्स्  २०२३ होण्याचा मान गौरीने मिळवला आहे. २५ नोव्हेंबरला पार पडलेल्या या महाअंतिम सोहळ्यात श्रावणी वागळे, हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि गौरी अलका पगारे हे लिटिल चॅम्प्स टॉप ६ मध्ये पोहोचले होते.या सगळ्यांमध्येच अटीतटीचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर या सगळ्यांना मागे टाकत गौरी विजयी झाली. तर श्रावणी आणि जयेश हे उपविजेता ठरले आहेत. या दोघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

टॅग्स :सा रे ग म पटेलिव्हिजनसेलिब्रिटी