Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजीदा शेखने संपवले पती आमिर अलीसोबतचे नातं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:34 IST

संजीदा शेख आणि आमिर अली यांच्या नात्यात दुरावा आल्याचा चर्चा गेल्या महिन्यांपासून आहेत

संजीदा शेख आणि आमिर अली यांच्या नात्यात दुरावा आल्याचा चर्चा गेल्या महिन्यांपासून आहेत. संजीदा आणि आमिरच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार संजीदाने आमिरचे घर सोडले आहे. आमिर आली दोघांमध्ये आलेल्या दुराव्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने संजीदाला तयार देखील केले होते. मात्र संजीदाच्या मनात काही तरी आणखी सुरु होते.  रिपोर्टनुसार दोघांनी नात्यावर काम करण्याचे ठरवले आणि अचानक संजीदाने आमिरला सांगितले की ती आईच्या घरी जाते आहे.  आमिरला वाटले काही दिवसात ती परत येईल मात्र असे झाले नाही. संजीदाने नातं संपवण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार आमिर अली आणि संजीदा शेख यांच्यातील भांडणे खूप जास्त वाढली होती.    

अजूनपर्यंत आमिर किंवा संजीदा कुणीच कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केलेली नाही. रिपोर्टनुसार दोघे लवकरच अधिकृतरित्या वेगळे होण्याचा मार्गावर आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतक  2012 मध्ये संजीदा शेख आणि आमिर अली लग्नबंधनात अडकले.

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच आमिरने देखील अनेक हिट मालिका दिल्या आहेत.

टॅग्स :संजीदा शेख