Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी खरेदी केली नवीन कार...! 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्रीने शेअर केली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:18 IST

'संगीत देवभाबळी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली नवी पाहुणी, घेतली नवीकोरी गाडी; निमित्त आहे खूपच खास

Marathi Actress Gift New Car To Husband: आयुष्यात आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं सर्वसामान्यासह प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न सत्यात उतरावं यासाठी प्रत्येकजण अपार कष्ट घेत असतो. २०२६ या नव्या वर्षात अनेकांचं हे स्वप्न साकार झालं. यात मराठी कलाकारही कुठे मागे नाहीत. मराठी कलाविश्वातील अशा अनेक सेलिब्रिटींनी कुणी घर तर कुणी गाडी घर खरेदी कलत स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या  नावाची भर पडली आहे. कोण आहे ही नायिका जाणून घेऊया...

दरम्यान, या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव म्हणजे शुभांगी सदावर्ते. 'संगीत देवबाभळी' या सुप्रसिद्ध नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने शुभांगी सदावर्तेच्या घरी नवी पाहुणी आली आहे. आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिनेत्रीने नव्या गाडीची खरेदी केली आहे. अभिनेत्रीने नेक्साची काळ्या रंगाची ही नवीकोरी गाडी घेतली आहे. सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत १० लाख इतकी आहे. 

नुकतीच सोशल मीडियावर शुभांगीने  खास पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली." मोठी स्वप्ने पहा, सकारात्मक राहा, कठोर परिश्रम करा आणि आयुष्याचा सुंदर प्रवास अनुभवा... माझ्याकडून  वाढदिवसानिमित्त सुमित म्हशीलकरला प्रेमाची भेट...", अशा आशयाची ही पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. दरम्यान, नवीन गाडी घेतल्यामुळे शुभांगी आणि पती सुमीत म्हशीळकर यांच्यावर संपूर्ण कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शुभांगी सदावर्तेच्या कामाबद्दल सांगायचं तर, 'संगीत देवबाभळी' या गाजलेल्या नाटकासोबतच तिने'लक्ष्य' आणि 'नवे लक्ष्य' या लोकप्रिय मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर ती 'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटामध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही निर्माता सुमित म्हशीलकरसोबत ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न उरकलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Shubhangi Sadavarte gifts new car on husband's birthday!

Web Summary : Actress Shubhangi Sadavarte, known for 'Sangeet Devbabhali', gifted her husband a Maruti Grand Vitara on his birthday. The car is valued at ₹10 lakh. She shared the joyful news on social media, with fans showering the couple with congratulations. Shubhangi has also acted in 'Lakshya' and 'Maharashtra Shaheer'.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया