Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये समय रैना-रणवीर अलाहाबादिया एकत्र; प्रोमो पाहून नेटकरी झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:26 IST

इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र!

Samay Raina Ranveer Allahbadia : 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या शोमुळे निर्माण झालेला वाद आणि कायदेशीर कारवाईनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया आता पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ही जोडी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या निमित्ताने पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या व्हिडीओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.

रणवीर आणि समय हे कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये धम्माल करताना दिसणार आहेत. नेटफ्लिक्सने विशेष टीझर प्रदर्शित केला आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या २६ सेकंदांच्या व्हिडीओची सुरुवात समय रैनाच्या संवादाने होते. समय म्हणतो, "मित्रांनो, मी अखेर माझ्या आवडत्या शोमध्ये येत आहे, पण माझ्यासोबत या शोमध्ये कोण सहभागी होणार आहे, हे मला अजून सांगितलेलं नाही". यावेळी रणवीर अलाहाबादिया एन्ट्री घेतो, तेव्हा रणवीरला पाहून समय निराश होतो आणि "अजिबात नाही, भावा!" असं म्हणत वैतागून तिथून निघून जातो.

कधी आणि कुठे पाहता येणार?

जागतिक हास्य दिनाच्या (Laughter Day) एक दिवस आधी, म्हणजेच २ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता हा विशेष भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा टीझर समोर येताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युझरने लिहिले, "संयुक्त एफआयआर दाखल करण्यापासून ते नेटफ्लिक्सचा चेक स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास... हे खरंच 'ऑरा मॅनेजमेंट'चं उत्तम उदाहरण आहे". तर दुसऱ्याने टोमणा मारला की, "पैसा ही मोठी क्रूर गोष्ट आहे, आता दोघांना मित्र असल्याचा आव आणावा लागेल".

दरम्यान, २०२५ मध्ये 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल एक अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या विधानानंतर समय आणि रणवीरवर फआयआर दाखल झाला होता. समय रैनानं काही दिवसांपूर्वी  'समय रैना – स्टिल अलाईव्ह' नावाचा व्हिडीओ शेअर करत 'इंडियाज गॉट लेटेंट' वादावर भाष्य केलं होतं. या व्हिडीओमध्ये त्यानं रणवीर अलाहाबादियाला जोरदार रोस्ट केलं होतं. यानंतर रणवीरचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात त्यानं "'कोण समय?' सध्या माझाच समय (वेळ) सुरू आहे" असा टोमणा मारला होता. यामुळे दोघांमध्ये वाद वाढल्याची चर्चा होती. आता कपिल शर्माच्या शोमध्ये हे दोघे एकमेकांची फिरकी कशी घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Samay Raina and Ranveer Allahbadia reunite on 'The Great Indian Kapil Show'

Web Summary : Samay Raina and Ranveer Allahbadia, after a legal dispute, are set to appear together on 'The Great Indian Kapil Show'. A teaser shows playful banter. The episode will air May 2nd on Netflix.
टॅग्स :रणवीर अलाहाबादियानेटफ्लिक्सजागतिक हास्य दिन