Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राच्या बहिणीवर भडकला सलमान खान; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:44 IST

बिग बॉसचा नवा प्रोमोमध्ये सलमान खान हा प्रियांका चोप्राच्या बहिणीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. 

बिग बॉस’च्या 17 व्या पर्वाची दिवसेंदिवस लोकप्रियता अधिकाधिक वाढत चालली आहे. बिग बॉस हे नवं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे टेलीव्हिजनवरील हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो टीआरपीमध्येही वाढ होत आहे. नुकताच बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान हा प्रियांका चोप्राच्या बहिणीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. 

 सलमान खान या विकेंडच्या वारला मन्नाराचा चांगलाच क्लास लावताना दिसणार आहे. 'बिग बाॅस 17'च्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये स्पष्ट दिसतंय. सलमान खान हा मन्नारा चोप्रा हिच्यावर संतापल्याचे दिसतंय. सलमान खान हा मन्नाराला आरसा दाखवण्याचे काम करतोय. सलमान खान मन्नारा चोप्राला म्हणतो, 'मी मन्नारा तुझ्यावर खूप नाराज आहे. मुनव्वर तु जग पाहिलं आहेस, असे कुठे होते का? मन्नाराल समजवण्याची तुझी जबाबदारी नाही.  ती स्वतः गेम खेळत आहे'. सलमानचे शब्द ऐकून मन्नारा रडताना दिसली.  

 'बिग बॉस 17'च्या घरात मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडेने एकमेंकीवर कॉफी फेकून नॉमिनेट केले. दोघींमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळत आहे. तर मन्नारा आणि मुन्नवर फारुकी यांच्यामध्ये घट्ट नातं असल्याचं दिसत आहे. तर शोच्या आगामी एपिसोडमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे. आता कार्यक्रमात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट बिग बॉसमध्ये ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :बिग बॉससलमान खानबॉलिवूड