Join us

Salman Khan ला डेंग्युची लागण? Bigg Boss 16 ची सुत्रे करण जोहरच्या हाती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 08:51 IST

सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)सध्या बिग बॉस 16 (Bigg Boss 16) हा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करताना दिसत आहे. तो प्रत्येक वीकेंडला शोमध्ये येतो आणि स्पर्धकांचा चांगली शाळा घेतो. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो येत्या वीकेंडला दिसणार नाही. यावेळी त्याच्या जागी करण जोहर (Karan Johar)दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामागचे कारण जाणून घेतल्यास सलमान खानच्या चाहत्यांना नक्कीच काळजी वाटेल. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला डेंग्यु (Dengue)ची लागण झाली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर काही आठवड्यांसाठी 'बिग बॉस'चा सीझन 16 होस्ट करणार आहे. त्याला सलमान खानच्या जागी बोलावण्यात आले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाला असून त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. जोपर्यंत सलमान खान बरा होत नाही तोपर्यंत शोची सूत्र करण जोहरच्या हातात राहातील.

 सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे. यावर सलमानच्या टीमकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान या आठवड्यात सुंबुल तौकीर खान, मन्या सिंग आणि शालीन भानोत यांना बिग बॉसमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता या वेळी कोण या शोमधून बाहेर पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉसडेंग्यूकरण जोहर