Join us

टिव्हीचा लाडका 'ग्रीन फ्लॅग' अभिनेता 'बिग बॉस'च्या घरात, रंगणार नवा ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 22:46 IST

अभिनेता गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे.

Gaurav Khanna In Bigg Boss 19: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' १९ व्या पर्वाला सुरुवात झाली आहे.  'अनुपमा' मालिकेत अनुज कपाडिया या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) याने आता 'बिग बॉस १९'च्या घरात प्रवेश केला आहे. गौरव खन्नाच्या एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

गौरव खन्ना गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. 'अनुपमा' मालिकेत त्याचा अंदाज, सौम्य व्यक्तिमत्त्व आणि अनुपमाबरोबरचा ऑन-स्क्रीन रोमॅन्समुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये भर पडली होती. 'बिग बॉस'हा शो नेहमीच वाद, ड्रामा, दोस्ती आणि तणावामुळे चर्चेत राहतो. गौरव खन्ना हा शांत, समंजस आणि संतुलित स्वभावाचा असल्याने तो घरात कसा परफॉर्म करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहणार आहे.

विशेष म्हणजे, गौरव खन्ना हा 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरल्यानंतर गौरव खन्नाला बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि काही रोख रक्कम देण्यात आली आहे. ट्रॉफीसोबत त्याला २० लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाले होते. आता तो 'बिग बॉस १९' ट्रॉफी पटकावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकार