Join us

पुन्हा एकदा पश्या पडला अंजीच्या प्रेमात; आकाश नलावडेचा पत्नीसोबत रोमॅण्टिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:44 IST

Akash nalawade: सध्या सोशल मीडियावर आकाश आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेने आणि त्यातील पात्रांनी कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं. त्यामुळे आज ही मालिका संपून बरेच दिवस झाले. मात्र त्यातील कलाकारांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. या मालिकेतील सरु,अंजी यांच्यासोबतच एक भूमिका विशेष गाजली ती म्हणजे अभिनेता आकाश नलावडे याची. या मालिकेतील त्याने पश्या ही भूमिका साकारली होती. आकाश सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे त्याची वरचेवर चर्चा रंगत असते.

आकाश सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असून तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील घडामोडी,किस्से शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या पत्नीसोबतचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. 

सध्या सोशल मीडियावर आकाश आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आकाशने रुचिका धुरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. रुचिका कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, नेटकऱ्यांमध्ये ती कायम चर्चेत असते.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी