Join us

रिअल लाइफ अंजीसोबत पश्या झाला रोमॅण्टिक; लग्नाला एक महिना पूर्ण होताच शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:52 IST

Akash Nalawade: आकाशच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने त्याने हा व्हिडीओ शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या.

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). या मालिकेतील अनेक कलाकार सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. त्यातला एक अभिनेता म्हणजे आकाश नलावडे (Akash Nalawade). या मालिकेत पश्याची भूमिका साकारुन चर्चेत आलेला आकाश सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत येत आहे.

अलिकडेच आकाशने रुचिका धुरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली. अलिकडेच आकाशने सहपत्नी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता त्याने लग्नातील एका गोड आठवणीला उजाळा दिला आहे.

आकाशच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला असून त्याने त्याच्या रिसेप्शन पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी रुचिकासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बँकग्राऊंडला शाहरुख खान- अनुष्का शर्मा यांच्या 'रबने बना दी जोडी' या सिनेमातील 'तुझ में रब दिखता हैं ' हे गाणं सुरु आहे.

दरम्यान, आकाशच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. या लग्नसोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंबाने हजेरी लावली होती. तसंच या लग्नसोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन