Join us

सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."

By देवेंद्र जाधव | Updated: May 12, 2025 13:41 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास किस्सा सांगितला आहे. जो वाचून तुम्हालाही आनंद होईल (samir choughule)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्वांचे लाडके कलाकार समीर चौघुले (samir choughule) सध्या 'गुलकंद' सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने समीर चौघुलेंनी सचिन तेंडुलकरविषयीचा (sachin tendulkar) खास किस्सा अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. समीर म्हणतात, "आमचे कौस्तुभ साठे म्हणून स्नेही आहेत. माझ्या मित्राचे ते भाऊ आहेत. त्यांनी हा किस्सा सांगितला. ते क्रिकेटवर मॅगझीन लिहितात. नितीन तेंडुलकर जे सचिन तेंडुलकर यांचे मोठे भाऊ आहेत त्यांच्याकडे ते गेले होते."

"त्यावेळी जनरल ते क्रिकेटबद्दल गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी विचारलं की, 'तुम्ही नाटक वगैरे बघता की नाही?'. त्यावेळी नितीन तेंडुलकर म्हणाले 'हो, आम्ही नाटकं बघतो., 'मग मराठीत काही बघता का?' असं विचारल्यावर मग हळूहळू हास्यजत्रेचा विषय निघालाय. 'हो आम्ही बघतो', असं ते म्हणाले."

"त्यानंतर नितीन तेंडुलकरांनी मेसेज दाखवला. जो सचिन तेंडुलकर सरांनी त्यांच्या भावाला म्हणजेच नितीन यांना पाठवला होता. जाऊया गप्पांच्या गावाचं स्कीट त्यांनी पाठवलं होतं. नितीन, हे स्कीट तू बघ. अनेक वर्षांनी मराठीत इतका निखळ विनोद आला आहे. समीर चौघुलेंचं हे स्कीट बघ, असा तो मेसेज होता. सचिन तेंडुलकर हे देव आहेत माझ्यासाठी. मी त्यांना एका इंग्रजी नाटकादरम्यान भेटलो आहे. त्यावेळेला समीर चौघुले कोण हे त्यांना कदाचित माहित नसावं. पण ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर चेरीश करणारी ही घटना आहे."

"यापुढे मी सचिनसरांना कधी भेटेन माहित नाही, पण तेव्हा मी हा किस्सा नक्कीच सांगेन. पण माझ्यासाठी जीवनाचं सार्थक होण्याचा क्षण होता. मी त्यांना २००७ ला एकदा भेटलो होतो. त्यावेळी सचिन सरांचं टेनिस एल्बोचं ऑपरेशन झालं होतं. तो माझ्यासाठी स्ट्रगलचा काळ होता. त्यांनी माझा अभिनय बघितलाय. २ तास माझं नाटक बघितलंय. येऊन कौतुकही केलंय. पण आता एक नाव झाल्यानंतर त्यांना माहित असेल समीर चौघुले कोण आहे. त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो नाही. मला फक्त ५ मिनिटं तु्म्हाला भेटायचंय." 

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रासचिन तेंडुलकरमराठी अभिनेताटेलिव्हिजन