Join us  

काकू झालीये टिपिकल बाई! मुग्धाच्या फोटोवर आली कमेंट, प्रथमेशने दिलं कोकणी स्टाईल चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 2:33 PM

मुग्धाला काकू म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना प्रथमेशने दिलं जशास तसं उत्तर

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) हे सर्वात गोड कपल. दोघंही आपल्या मराठी संस्कृतीला जपतात आणि हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अनेकदा जाणवतं. पण कोणी चांगलं केलं तरीही ट्रोल करणारे लोक काही कमी नसतात. नुकतंच मुग्धाने लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रथमोशसोबत देवदर्शन केलं. याचे फोटो तिने पोस्ट केलेत. यावर तिला 'काकूबाई' असं एका मुलीनेच चिडवलं आहे. तिला प्रथमेशने टिपीकल कोकणी स्टाईल प्रत्युत्तर दिलंय.

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले. यानिमित्त मुग्धाने सुरेख फोटो पोस्ट केलेत. यामध्ये ती निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. केसात छान गजरा माळला आहे आणि गळ्यात मंगळसूत्र आहे. या पारंपरिक लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तर प्रथमेशने हिरव्या रंगाचा शर्ट आणि ब्लू जीन्स असा लूक केला आहे. मुग्धा लिहिते, 'कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले!😍याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं!'

हेची घडो मज जन्मजन्मांतरीमागणे श्रीहरी नाही दुजे | असंही तिने लिहिलं.

मुग्धाच्या या पोस्टवर एका मुलीने खोचक कमेंट केली. 'काकु झाले आहे टिपिकल बाई' अशी ती कमेंट आहे. यावर मुग्धानेही जशात तसं उत्तर देत लिहिलं,'थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट, आजी.' यावर ती मुलगी म्हणाली, 'मी काय तुझ्यासारखी नाही मॉडर्न आहे तू अगदी टिपिकल बाई दिसतेय.' या कमेंटनंतर मात्र मुग्धाचा नवरा प्रथमेशनेच तिला उत्तर दिलं. 'आमच्या कोकणात एक म्हण आहे.. “माकड म्हणतं आपलीच लाल..” just सांगितलं.. बाकी मनात काही नाही आजी..' अशी कोकणी स्टाईल कमेंट त्याने केली. चाहत्यांनीही दोघांची बाजू घेत छान उत्तर दिलंत अशा कमेंट्स केल्या.

 

मुग्धा अलिबागची असून प्रथमेश रत्नागिरीचा आहे. दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत. कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा स्वभाव चाहत्यांच्याही खूप पसंतीस पडतो.

टॅग्स :सा रे ग म पमराठी गाणीमराठीसोशल मीडियाट्रोल