Join us

पाकिस्तानच्या 'या' मित्र राष्ट्रावर भारताने बहिष्कार टाकावा, रुपाली गांगुलीचं महत्त्वाचं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:43 IST

अभिनेत्री रुपाली गांगुलीनं भारतीयांना पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

India Pakistan: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत.  यात तुर्कस्थान (Turkey) हा देश पाकिस्तानची बाजू घेताना दिसला आहे. यामुळे पाकिस्तानच्या या मित्र राष्ट्रावर भारताने बहिष्कार टाकण्याची भुमिका भारतीय नागरिकांनी घेतली आहे.  देशात 'बॉयकॉट तुर्की' हे अभियान सुरु झालं आहे. याची सुरुवातच महाराष्ट्रातील पुण्यापासून राजस्थानच्या उदयपूरपर्यंत व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून आयात करण्यात आलेल्या वस्तुंवर बहिष्कार टाकून तुर्कीला आर्थिक आघाडीवर उत्तर द्यायची घोषणा केली आहे. यातच 'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीनं भारतीयांना तुर्कीच्या टूरिझ्मवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

रुपाली गांगुलीने तिच्या एक्स ( पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहलं, "कृपया आपण तुर्कीचे बुकिंग्स रद्द करू शकतो का? मी सर्व भारतीय सेलिब्रिटींना, इन्फ्लुएन्सर्सना आणि पर्यटकांना ही विनंती करतेय. भारतीय म्हणून आपण किमान एवढं तरी करू शकतो", असं म्हणत तिनं  भारतीय नागरिकांना एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. यासोबत #BoycottTurkey असा हॅशटॅगसुद्धा जोडला आहे.

दरम्यान, पाकिस्तान-तुर्कीचे लष्करी संबंध ऐतिहासिक असून, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांचे राजकीय समर्थक राहिले आहेत.  तुर्कीला मुस्लिम राष्ट्रांचा तारणहार बनायचे आहे. तसेच तुर्कीकडे अद्ययावत ड्रोन, शस्त्रे आहेत. ती पाकिस्तानला दिली तर मुस्लिम राष्ट्रांत आपण हिरो होणार, सौदी मागे पडणार अशा तयारीत ते आहेत. दुसरीकडे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध राजकीय परिस्थितींमुळे तणावग्रस्त आहेत. विशेषतः काश्मीर विषयावर, तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन करत भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणांचा विरोध केला होता.

टॅग्स :सेलिब्रिटीभारतपाकिस्तान