Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:47 IST

रुपाली गांगुलीची वकील सना रईस खानने यासंदर्भात माहिती दिली आहे.

'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे.  सावत्र मुलगी ईशा वर्माने रुपालीवर अनेक गंभीर आरोप केले. काही दिवसांपासून रुपाली गांगुलीवर आरोपांचाच सिलसिला सुरु आहे. रुपालीने आईवडिलांचा संसार मोडल्याचा सावत्र लेकीने आरोप केला. या सर्व प्रकारावर रुपाली शांत होती. काल तिने ईशावर थेट ५० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला. आश्चर्य म्हणजे यानंतर ईशाने तिचं ट्विटर अकाऊंटच डिलीट केलं आहे.

रुपाली गांगुलीने वकील सना रईस खानच्या मार्फत ईशा वर्मावर मानहानीचा खटला दाखल केला. सना रईस खान ही तीच आहे जी बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली होती. माध्यमांशी बोलताना सना म्हणाली, "आम्ही केलेल्या कायदेशीर कारवाईनंतर रुपाली यांच्या सावत्र मुलीने अपमानजनक पोस्ट हटवले आहेत. इतकंच नाही तर ट्विटर अकाऊंटही डिलिट केलं आहे. यावरुन सिद्ध होतं की आम्ही जिंकलो आहोत. बेजबाबदार वक्तव्यांना कुठेच जागा नाही."

ती पुढे म्हणाली, "आमच्या कायदेशीर कारवाईनंतर अपमानजनक पोस्ट हटवणं म्हणजे तिने चुकांचा स्वीकार करण्यासारखंच आहे. यामुळे आमची बाजू आणखी स्ट्राँग झाली आहे. हे प्रकरण कोणाच्याही अब्रुचे संरक्षणासाठी चांगलं उदाहरण आहे."

टॅग्स :टिव्ही कलाकारन्यायालयसोशल मीडियापरिवार