Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम गर्लला भेटल्यानंतर रुपाली भोसले भारावली, म्हणाली, "तू सुंदर दिसतेस असं त्या म्हणाल्या आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:52 IST

रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हेमा मालिनींबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. हेमा मालिनींना भेटल्यानंतर रुपाली भारावून गेली आहे.

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. 'आई कुठे काय करते'मधील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. याच मालिकेत संजना हे पात्र साकारून रुपाली भोसले घराघरात पोहोचली. रुपालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अनेकांची ड्रीम गर्ल असलेली रुपाली नुकतीच सिनेसृष्टीच्या ड्रीम गर्लला भेटली. 

नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि रुपाली भोसले यांची भेट झाली. रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हेमा मालिनींबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. हेमा मालिनींना भेटल्यानंतर रुपाली भारावून गेली आहे. "ड्रीम गर्ल...त्यांचं सौंदर्य पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्यांना लाइव्ह डान्स करताा पाहणं सुखदायक होतं. त्यांच्यासमोर परफॉर्म करणं ही भावना आणि अनुभव फारच छान होता. जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्या मला म्हणाल्या की तू सुंदर दिसतेस आणि तू परफॉर्मही छान केलंस. थँक्यू यू हेमा मॅम..लव्ह यू," असं रुपालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

रुपालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'आई कुठे काय करते'मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रुपाली 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाली होती. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकारुपाली भोसलेहेमा मालिनीटिव्ही कलाकार