Join us

कृष्ण जन्मला! रुपाली भोसलेने घरी साजरी केली गोकुळाष्टमी, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:50 IST

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या घरी गोकुळाष्टमीचा सण साजरा केला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर करत चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आज सर्वत्र गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी कृष्णाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी घरी गोकुळाष्टमी साजरी करतात. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या घरी गोकुळाष्टमीचा सण साजरा केला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर करत चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

रुपालीने तिच्या घरी कृष्ण जन्मसोहळा साजरा केला. बालकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत त्याची पूजा करत रुपालीने कृष्णजन्माष्टमी साजरी केली. व्हिडीओत महिलांसह रुपाली कृष्णजन्माष्टमी साजरी करताना दिसत आहे. "गोविंदा रे गोपाळा...गोपाळाच्या पावलांचा गोड ठसा, जीवनात नेहमी राहो असा, जन्माष्टमीच्या शुभक्षणी, आशीर्वाद लाभो अपार कृपेचा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! राधे राधे", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेतून रुपालीला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'लपंडाव' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

टॅग्स :जन्माष्टमीरुपाली भोसले