Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गरोदर पत्नीबरोबर फोटो का टाकत नाहीस?", चाहत्याच्या प्रश्नाला रुबिना दिलैकच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 16:58 IST

"रुबिनाबरोबर फोटो पोस्ट का करत नाहीस?" असा प्रश्न चाहत्याने विचारला. अभिनवने चाहत्याच्या या प्रश्नाला पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. 

टेलिव्हिजनवरील छोटी बहूने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांनी दिली. टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक लग्नाच्या पाच वर्षांनी गरोदर आहे. पती अभिनव शुक्लाबरोबर बेबी बंपचा फोटो फ्लाँट करत रुबिनाने आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. रुबिना सध्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे.

रुबिनाचा पती अभिनव शुक्लादेखील एक अभिनेता आहे. त्याचं प्रचंड मोठं फॅन फॉलोविंग असून तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनव अनेकदा त्याचे फोटो शेअर करताना दिसतो. पण, गरोदर पत्नीबरोबर फोटो शेअर न केल्यामुळे एका चाहत्याने अभिनेत्याला थेट कमेंटमध्येच विचारलं. "रुबिनाबरोबर फोटो पोस्ट का करत नाहीस?" असा प्रश्न चाहत्याने विचारला. अभिनवने चाहत्याच्या या प्रश्नाला पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. 

"मी ज्या गोष्टी करतो, त्यासाठी घरातून पाठिंबा आहे. मी खूप काही करतो आणि या गोष्टी मला सार्वजनिक करायला आवडत नाहीत. हे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आनंदाचे क्षण आहेत. प्रेम आणि काळजी फक्त सोशल मीडियावर दाखवूनच व्यक्त केली जात नाही," असं म्हणत अभिनवने चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

रुबिना आणि अभिनव शुक्लाने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस १४’मध्ये ते दोघं सहभागी झाले होते. या पर्वाची रुबिना विजेतीही ठरली होती. रुबिना आणि अभिनव घटस्फोट घेत विभक्त होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, ‘बिग बॉस’मुळे त्यांच्यातील वाद मिटले आणि त्यांनी वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा होणार असल्यामुळे ते आनंदी आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारगर्भवती महिला