Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पाच वर्षानंतर आई होणार छोटी बहू, ४ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 18:58 IST

तं. गेल्या काही दिवसांपासून रुबिना गरोदर असल्याची चर्चा होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक अभिनयाबरोबरच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. ‘छोटी बहू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस १४’मध्येही रुबिना सहभागी झाली होती. रुबिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून रुबिना गरोदर असल्याची चर्चा होती. आता अखेर रुबिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी कन्फर्म झालीआहे. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक लवकरच आई-बाबा होणार आहेत. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, रुबिना दिलैकच्या प्रेग्नेंसीची बातमी खरी आहे. अभिनेत्री सध्या गरोदर आहे. खुद्द रुबिना दिलैकशी संबंधित एका व्यक्तीने मीडियाशी बोलताना याची पुष्टी केली आहे. सूत्राने सांगितले की, 'रुबिनाच्या गरोदरपणाची बातमी खरी आहे. अभिनव शुक्ला लवकरच पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. रुबिना चार महिन्यांची गर्भवती आहे. 

हिमाचल प्रदेशचे रहिवासी रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणे पसंत करतात. यामुळेच तिने प्रेग्नेंसीची चर्चा आत्तापर्यंत मीडियापासून लपवून ठेवली होती. रुबिना सध्या मदरहुड एन्जॉय करतेय. 

दरम्यान, मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलेल्या रुबिनाने अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. ते दोघेही ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला होता. परंतु, या शोनंतर त्यांच्यातील दुरावा मिटला. अनेकदा ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

टॅग्स :टिव्ही कलाकार