Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी, ब्लॉकबस्टर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 18:02 IST

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या 'वेड' (Ved Marathi Movie) सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख निर्मित वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. सिनेमातले संवाद, गाणी आणि महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थात रितेश आणि जिनिलिया देशमुख या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. प्रेमातला हा वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आलीय. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना पहाता येईल.

वेड या ब्लॉकबस्टर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर महाराष्ट्राच्या नंबर वाहिनीवर होतोय याविषयी सांगताना सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्राचा लाडका सिनेमा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे याचा आनंद आहे. वेड सिनेमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांचा लाडका सिनेमा आता घरबसल्या कुटुंबासोबत स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे. थिएटर बाहेर ज्याप्रमाणे हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते तोच दिलखुलास प्रतिसाद वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला मिळेल याची मला खात्री आहे.’

निर्मात्या आणि लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखिल प्रेक्षकांना वेड सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पहाण्याचं आवाहन केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे अशी भावना जिनिलिया देशमुख यांनी व्यक्त केली.

वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला होता. रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. ५० दिवसांत 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला होता तर देशात ६०. ६७ कोटींचा बिझनेस केला होता.  'वेड'ने एकूण ७५ कोटींची कमाई केली होती.  

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुख