Join us

'वीकेंड का वार'च्या आधी रितेश देशमुख देणार 'भाऊचा धक्का', 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 14:27 IST

आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये विकेंड का वार रंगणार आहे. याआधी बिग बॉस मराठीचं रितेश देशमुखवर शूट झालेलं नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे.रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का'  म्हणजेच विकेंड का वार पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलं आहे. हे गाणंही अल्पावधीत व्हायरल झालंय.

भाऊचा धक्का धमाल गाणं भेटीला

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. "लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया, हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं", असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच.

रितेशच्या 'भाऊच्या धक्का'ची उत्सुकता

'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्यावर' घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार. 'BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर बघता येईल.

टॅग्स :रितेश देशमुखकलर्स मराठीबिग बॉस मराठी