Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेम होतच, आहेच आणि कायम राहणार..." रेश्मा शिंदेची मित्राच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:38 IST

रेश्माने आशुतोष गोखलेच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. रेश्मा आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. रेश्मा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. आज रेश्माचा खास मित्र आशुतोष गोखलेचा  (Aashutosh Gokhale)वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेश्माने खास पोस्ट शेअर केली आहे. 

रेश्माने आशुतोष गोखलेच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रेश्माने आशुतोषसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "असा हा आमचा आशू, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणतो हासू, आम्ही सगळे ह्याच्यासोबत असतो खुशू.. हॅपी bday आशू.. हॅपी bday", या शब्दात तिनं अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच "आशू.... प्रेम होतच, आहेच आणि कायम राहणार..." असंही तिनं लिहलं.  रेश्माच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

रेश्मा आणि आशुतोष गोखले यांची खास मैत्री आहे. दोघांनी 'स्टार प्रवाह'वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील एकत्र काम केलं होतं. रेश्मा शिंदेनं दीपा नावाचं पात्र साकारलं होतं. तर आशुतोष हा कार्तिक इमानदारच्या भूमिकेत झळकला होता. त्यांची मालिकेतील कार्तिक आणि दीपा ही जोडी लोकप्रिय ठरली होती.   मालिका संपली असली तरी दोघांमधील मैत्री कायम आहे. 'रंग माझा वेगळा' गाजवल्यानंतर आशुतोष गोखले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत काम करताना दिसतो आहे. या मालिकेत अभिनेता खलनायिकी भूमिकेत आहे. तर रेश्मा ही 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत  आदर्श सुनेची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेसेलिब्रिटीमराठी अभिनेता