छोट्या पडद्यावरच्या काही मालिका जशा कायम लक्षात राहतात, तशाच काही जाहिरातीही कायम स्मरणात राहतात. अशीच एक जाहिरात म्हणजे, ‘अॅक्शन स्कूल शूज’ची. ही जाहिरात अनेकांना आजही आठवत असेल.ओ हो हो स्कूल टाइमअॅक्शन का स्कूल टाइम प्रेयर्ज होती एव्हरी मॉर्निंगस्टाईल से होती सबकी चेकिंगक्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट लेक्चर..गुड... गुड मॉर्निंग टीचरफायटिंग, फ्रेण्डशीप, मस्ती, पीटीबजी बेल और हो गयी छुट्टीओ हो हो स्कूल टाइमअॅक्शन का स्कूल टाइम...
हीच ती जाहिरात. नव्वदीच्या दशकातील ही जाहिरात आणि त्याचे जिंगल आठवण्याचे कारण म्हणजे, या जाहिरातील एक क्यूट चेह-याचा चिमुकला.
कुरळे केस, बोलके डोळे असलेल्या या जाहिरातील चिमुकल्याचा चेहरा आजही डोळ्यांपुढे येतो. त्याचे नाव आहे तेजन दिवानजी. ‘अॅक्शन शूज’सोबत् मॅगी, बँड-एडसारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तो झळकला होता. ‘पहला नशा’ या गाण्याच्या रिमिक्समध्येही तो दिसला होता. हा चिमुकला आज कसा दिसतो? काय करतो? असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. तर चला, आज जाणून घेऊयात हा चिमुरडा सध्या काय करतो, कसा दिसतो ते.