Join us

मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:49 IST

सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जाता येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल.

लॉकडाऊनमुळे तेजश्री प्रधान सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. गेल्या १२ वर्षात मला इतका मोकळा वेळ मिळाला नव्हता. माझं सतत काहीना काही सुरु होतं. त्यामुळे मला बरं वाटतंय. सध्या मी फक्त आराम करतेय. मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग स्वतःसाठी करून घेतेय. रिकामा वेळ आणि आराम या दोन्ही गोष्टींचा आनंद घेतेय. एरवी रोजच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमामुळे डाएटकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे आता डाएटकडेही लक्ष देतेय. रोज थोडा वेळ योगा करते आणि बाकी वेळेत नवीन वेब सिरीज आणि चित्रपट बघते.

खरं सांगायचं तर जी विश्रांती मिळाली आहे त्याची मला गरज होती. सक्तीची सुट्टी का होईना, पण मोकळा वेळ मिळाल्याने मी आनंदी आहे. पण घरातून बाहेर जाणं, फिरणं या गोष्टींची आठवण येते. घरात असून देखील सोशल मीडियावर कमी असण्याचं कारण म्हणजे हा वेळ माझा आहे आणि सोशल मीडियावर राहून तो फुकट घालवणे मला पटत नाही.

एरवी वेळेअभावी खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि त्या करायची संधी आता मिळाली आहे. तर त्या संधीचं सोनं करायला हवं. खरं सांगायचं तर सोशल मीडियावर लाईव्ह वगैरे येणं मला फारसं आवडत नाही. एकदा सगळं पूर्ववत झालं कि हे सर्व करायचंच आहे. म्हणून सध्या मी सोशल मीडियापासून जरा लांब आहे.

सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जाता येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल.

 

टॅग्स :तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई