Join us

रवी दुबे अभिनया व्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 18:18 IST

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिएलिटी शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता रवी दुबे करणार आहे. 

ठळक मुद्दे ‘जमाई राजा’ या मालिकेत नायकाची भूमिका रवी दुबेने साकारली होती सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचे सूत्रसंचालन करणार रवी करणार आहे

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिएलिटी शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता रवी दुबे करणार आहे. 

‘झी टीव्ही’वरील ‘जमाई राजा’ या मालिकेत नायकाची भूमिका केल्यानंतर रवी दुबे या वाहिनीवर तब्बल तीन वर्षांनी परतणार आहे. रवी म्हणाला, “माझं लहान मुलांशी एक भक्कम नातं असून मला त्यांच्या अवतीभोवती राहायला आवडतं. मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली याचं खरं कारण असं की तब्बल 23 वर्षांनंतरही भारतातील रिएलिटी शोमध्ये ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ शोने आपलं स्थान कायम राखलं आहे. आपल्या कार्यक्रमात सतत बदल करून त्याने प्रेक्षकांशी नातं कायम ठेवलं असून इतक्या वर्षांत या कार्यक्रमातून जे गुणी गायक तयार झाले आहेत, त्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे.”

तो पुढे म्हणाला, “अभिनयाइतकंच मला कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायलाही खूप आवडतं. खरं तर इतक्या वर्षांनंतर सूत्रसंचालनाची मला आवडच विकसित झाली आहे. आता ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’सारख्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत असल्याचा मला खूप आनंद होत असून मी झी टीव्ही वाहिनीशी नेहमीच निगडित राहिलो आहे. या वाहिनीवर काम करणं म्हणजे स्वगृही परतण्यासारखं आहे.”

टॅग्स :सा रे ग म परवि दुबे