Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चालेचे' कलाकार येणार 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 08:00 IST

मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

ठळक मुद्दे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहेया मालिकेतील कलाकार लवकरच 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार आहेत

प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बच्चे कंपनी आणि शेवंता व अण्णा थुकरट वाडीत सज्ज होणार आहेत. आता हे सगळे कलाकार थुकरट वाडीत आल्यानंतर विनोदवीरांनी देखील एकच कल्ला केला. रात्रीस खेळ चाले या मालिकेवर आधारित एक धमाल विनोदी स्पूफ हे विनोदवीर सादर करणार आहेत. ज्यात भाऊ कदम 'अण्णा', श्रेया बुगडे 'शेवंता', कुशल बद्रिके 'माई' आणि बाकी कलाकार बच्चे कंपनी साकारणार आहे. त्यांचा हा ऍक्ट पाहून प्रेक्षक पोट धरून हसणार यात शंकाच नाही. .

टॅग्स :चला हवा येऊ द्यारात्रीस खेळ चाले