Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीस खेळ चाले 2 : अण्णा-शेवंताचा रोमान्स आता बास्स! पडद्यामागे फुलतेय अण्णा-माईंचे प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 13:24 IST

नेटकरी फिदा...

ठळक मुद्दे‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका सध्या विलक्षण वळणावर पोहोचली आहे.

रात्रीस खेळ चाले’ या मराठी मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या दुस-या पर्वानेही अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आत्तापर्यंत या मालिकेत अण्णा व शेवंताचा  रोमान्स आपण पाहिला. आता अण्णा आणि माईचा रोमान्स  पाहायला मिळतोय. अण्णा अर्थात माधव अभ्यंकर आणि माई म्हणजेच शकुंतला नरे यांच्या पडद्यामागच्या रोमान्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अण्णा व माईचे ‘टिकटॉक’ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांची धम्माल केमिस्ट्री पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत.मध्यंतरी अण्णा आणि शेवंताचा गोव्याच्या बिचवरचा रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. गुलाबी शर्टातील अण्णा आणि पिवळ्या शिफॉन साडीतील शेवंता यांचा हा रोमान्स चर्चेचा विषय ठरला होता. आता पडद्यामागचा अण्णा व माई यांचा टिकटॉक रोमान्स चर्चेचा विषय ठरतोय.

@rekhamane5

♬ original sound  - prajakta

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये  प्रेमळ माई प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेत माईची भूमिका शकुंतला नरे साकारत असून या मालिकेत त्या अण्णांच्या पत्नीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत.

@rekhamane5

♬ Original Sound - Unknown

‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका सध्या विलक्षण वळणावर पोहोचली आहे. नेने वकिलांच्या मदतीने शेवंताला नाईकांच्या वाड्यासमोरच घर मिळते. एकीकडे माई मात्र अण्णांना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे शेवंता हार न मानता धीटपणे सगळ्या परिस्थितीला सामोरी जातेय. माईच्या कणखरपणापुढे अण्णा देखील काहीसे हतबल झालेले दिसत आहेत. माई आणि शेवंताची खुन्नस मालिकेची रंजकता अजून वाढवत आहेत.

@rekhamane5

♬ original sound  - vidyamh

@rekhamane5

♬ original sound - hemangiikavi
टॅग्स :रात्रीस खेळ चाले