Join us

Shocking! रश्मी देसाईचे बँक स्टेटमेंट लीक झाल्याचा दावा, अरहान खानने अकाउंटमधून काढले 15 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:15 IST

अरहानने रश्मीच्या गैरहजेरीत तिच्या अकाउंटमधून लाखो रुपये काढल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉस 13 फेम रश्मी देसाई आणि अरहान खान पुन्हा रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांचे ब्रेकअपदेखील झाले. रश्मीच्या समोर अरहानने केलेली फसवणूक समोर आली. त्याचे पहिले लग्न व मुलं असल्याचा खुलासा झाला. त्यात असे वृत्त आले की अरहानने रश्मीच्या गैरहजेरीत तिच्या अकाउंटमधून लाखो रुपये काढले.

या प्रकरणात आता नवं वळण आलं आहे. सोशल मीडियावर रश्मी देसाईचे बँक स्टेटमेंट लीक झाल्याचा दावा केला जात आहे. हे स्टेटमेंट रश्मीच्या चाहत्याने शेअर केले आहे. या स्टेटमेंटमध्ये दावा करण्यात आले आहे की अरहान खानने रश्मीच्या अकाउंटमधून लाखो रुपये काढले आहेत. त्यावेळी रश्मी बिग बॉसच्या घरात होती.

हे व्हायरल होत असलेले स्टेटमेंट खरे आहे की नाही आणि हे रश्मीचं अकाउंट आहे की नाही, याबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. तसेच याबद्दल रश्मीकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. व्हायरल होत असलेल्या स्टेटमेंटमध्ये शिवानी अजय कुमार देसाई असे नाव लिहिलेले आहे. शिवानी हे रश्मीचे खरे नाव असल्याचं सांगितलं जातंय. बँक स्टेटमेंट शेअर करून रश्मीचे चाहते अरहानला ट्रोल करत आहे. #FraudArhaanKhan हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  यासोबतच रश्मीचे चाहते अभिनेत्रीचे पैसे परत करायला सांगत आहेत आणि अरहानला चोर संबोधत आहेत.

रश्मीच्या दुसऱ्या चाहत्याने दावा केला आहे की हे सगळे पाहूनच रश्मी डिप्रेशनमध्ये गेली होती. अरहानमुळे ती अडचणीत आली आहे. पण आम्ही रश्मीचे चाहते तिला प्रोटेक्ट करणार.

बिग बॉस 13मध्ये सलमान खानने रश्मी देसाईसमोर अरहान खानबद्दल खुलासा केला होता. सलमाननेच रश्मीसमोर अरहानचे सत्य समोर आणले होते. त्यानंतर अरहान व रश्मीच्या नात्यात कटुता आली होती.

टॅग्स :रश्मी देसाईबिग बॉससलमान खान