Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...! ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 10:27 IST

धक्कादायक खुलासा

ठळक मुद्देरश्मी देसाई आज छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे.

बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये छोट्या पडद्यावरचा एक चेहरा प्रचंड चर्चेत राहिला. तो म्हणजे रश्मी देसाई.बिग बॉस 13’मधून बाहेर पडल्यानंतर आता रश्मीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, एका ऑडिशनदरम्यान रश्मी कास्टिंग काऊचची शिकार झाली होती. ‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला. आपबीती सांगताना ती म्हणाली, ‘मला आठवते, कास्टिंग काऊचमधून गेली नाहीस तर इंडस्ट्रीत काम मिळणे बंद होईल,असे त्याने मला सांगितले होते.  त्याचे नाव सूरज होते. तो आता कुठे आहे, मला ठाऊक नाही. पण मी पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हा त्याने मला माझ्या फिगरबद्दल विचारले होते. त्या  स्टॅटिस्टिक्सचा अर्थही मला माहित नव्हता. माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारा, माझ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणारा तो पहिला माणूस होता.  एके दिवशी त्याने मला ऑडिशनसाठी बोलावले.

मी आनंदात होते. पण तिथे पोहोचल्यावर, त्याठिकाणी त्याच्याशिवाय कुणीही नव्हते. साधा कॅमेराही नव्हता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी  मिसळून मला बेशुद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.  मला हे काही करायचे नाही, हे मी सतत त्याला सांगत होते. दोन-अडीच तासानंतर मी तिथून बाहेर आले आणि घरी पोहोचल्यावर आईला सर्व सांगितले.

माझ्या आईने त्याला फोन करून रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवले. दुस-या दिवशी आई त्याला भेटायला गेली आणि माझ्या आईने सर्वांसमोर त्याच्या थोबाडीत लगावली. माझ्या मुलीसोबत पुन्हा असे काही करण्याची हिंमत करू नकोस. मी तुला सोडणार नाही, अशी तंबीच तिने त्याला दिली होती.’  

रश्मी देसाई आज छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेय. ‘उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह अनेक भोजपुरी सिनेमांत तिने काम केलेय.

टॅग्स :रश्मी देसाईबिग बॉस