Join us

१५ लोकांपैकी फक्त 'या' तिघांशीच मैत्री झाली! बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:58 IST

आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर जाण्याची शिक्षा सुनावल्यावर घराबाहेर येऊन आर्याने या तिघांची नावं घेतली आहेत (aarya jadhav, bigg boss marathi 3)

आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमझील चर्चेतील स्पर्धक. शनिवारी आर्याला निक्कीवर हात उगारल्याने मोठी शिक्षा सुनावण्यात आली. आर्याला बिग बॉसने घरातून निष्कासीत केलं. त्यामुळे सर्वच स्तरांमधून नाराजीचे सूर उमटले आहेत. आर्याऐवजी निक्कीला शिक्षा झाली पाहिजे असं लोक म्हणत आहेत. अशातच घराबाहेर आल्यावर आर्याचा पहिला इंटरव्ह्यू समोर आलाय. या मुलाखतीत आर्याने घरात तिची कोणासोबत मैत्री झाली, याचा खुलासा केलाय. 

आर्याची या तिघांसोबत झाली मैत्री

आर्या जाधवने घराबाहेर आल्यावर जिओ आणि कलर्स मराठीला एक अधिकृत मुलाखत दिली. या मुलाखतीत आर्या म्हणाली की, "माझी घरात तीन लोकांशीच मैत्री झाली. यापैकी एक म्हणजे अंकिता वालावलकर, दोन म्हणजे सूरज चव्हाण आणि तीन म्हणजे वर्षाताई. जान्हवीशी मैत्री होत होती. पण अजुन थोडा वेळ घरात राहिले असते तर झालीही असती." अशाप्रकारे आर्याने बिग बॉसच्या घरातील मित्र म्हणून या सदस्यांची नावं घेतली.

घराबाहेर आल्यावर आर्याने केलं लाईव्ह

आर्या जाधवने घराबाहेर आल्यावर लाईव्ह सेशल केलं. यावेळी तिचे चाहत्यांनी आर्याच्या लाईव्हला खूप प्रतिसाद दिला. आर्याने यावेळी चाहत्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं दिली. पुन्हा बिग बॉसने जर बोलावलं तर जायला आवडेल का? निक्कीसोबत नक्की काय वाद झाला? चूक कोणाची, काय घडलं? अशा विविध प्रश्नांची आर्याने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. अनेकांना वाटत होतं की आर्या सीक्रेट रुममध्ये जाईल. पण तूर्तास असं काही होताना दिसणार नाहीय. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठी