Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा'मधील लोकप्रिय अभिनेत्री आता दिसणार '36 गुणी जोडी' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:21 IST

आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येत असते.

स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. आपापसातले हेवेदावे विसरुन दीपा-कार्तिक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. मेहंदी, हळद आणि संगीत साग्रसंगीत पद्धतीने पार पडल्यानंतर आता विवाहसोहळ्याकडे साऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपा-कार्तिकचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्यातला लूक भाव खाऊन गेला. 

 दीपा आणि कार्तिक यांच्या सतत विघ्न आणणाऱ्या आयेशाचा खोटेपणा समोर आल्यानं दीपा कार्तिक पुन्हा एकत्र आलेत. रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांचं लग्न झाल्यानंतर मालिका लीप घेणार आहे. तसेच या मालिकेत आयेशाची भूमिका साकारणारी विदीशा म्हसकर आता झी मराठीवर सुरू होत असलेल्या 36 गुणी जोडी या मालिकेत दिसणार आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना विदिशाने याबाबत खुलासा केला. ती दोनही मालिकेत दिसणार आहे. आयेशानं मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारूनही प्रेक्षकांची मनं जिंकली.

अभिनेत्री विदीशा म्हसकर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. विदीशाने हे मन बावरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. याशिवाय तिने ती फुलराणी आणि बन मस्का या मालिकेतही काम केले आहे. तसेच तिने दहा बाय दहा या नाटकातही काम केले आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहझी मराठी