Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rang Maza Vegla : दीपाचा खऱ्या आयुष्यातील 'रंग आहे वेगळा', तरीही तिला का केलं कास्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:22 IST

Rang Maza Vegla:रंग माझा वेगळा ही मालिका मुळात वर्णभेदावर भाष्य करणारी आहे. तरी या मालिकेची नायिका सावळी का नाही, याचे कारण समोर आले आहे.

रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. सध्या या मालिकेत दीपा आणि कार्तिक वेगळे झाले असून ते पुन्हा कधी एकत्र येणार याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान दीपाचा रंग सावळा आहे. मात्र दीपाची भूमिका साकारणारी रेश्मा खऱ्या आयुष्यात गोरी आहे. त्यामुळे सुरूवातीला तिची या मालिकेसाठी का निवड करण्यात आली, असा प्रश्न विचारण्यात येत होता. अखेर त्यामागचं कारण समोर आले आहे.

मराठी सीरियल्सच्या रिपोर्टनुसार, रंग माझा वेगळा ही मालिका मुळात वर्णभेदावर भाष्य करणारी आहे. तरी या मालिकेची नायिका सावळी का नाही, याचे कारण समोर आले आहे. ऑडिशन्समध्ये दीपा या व्यक्तिरेखेसाठी रेश्मा शिंदे ही सगळ्या अर्थानी योग्य वाटली. म्हणून दीपाच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली. 

रेश्मा शिंदेचे वर्कफ्रंटअभिनेत्री रेश्मा शिंदेने रंग माझा वेगळा मालिकेआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख या मालिकेतून मिळाली आहे. तसेच तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेतही काम केले आहे. तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती. तसेच ती 'लालबागची राणी' या चित्रपटात झळकली आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदे