Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम कपूरने हा काय व्हिडिओ पोस्ट केला? बायकोचा राग अनावर, म्हणाली, 'आता तुला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 14:17 IST

तो व्हिडिओ पाहून राम कपूरची बायको चांगलीच संतापली आहे.

'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) खऱ्या आयुष्यातफारच रोमॅंटिक आहे. तो नेहमी त्याची पत्नी गौतमी कपूर (Gautami Kapoor) हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने बायकोचा एक फारच विनोदी व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र तो व्हिडिओ बघून त्याची पत्नी त्याच्यावरच संतापली आहे. थेट सोशल मीडियावरच तिने नाराजी दाखवली आहे.

राम कपूरने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याची बायको गौतमी नाचताना आणि ठुमके लावताना दिसत आहे. 'क्युटीपाय' या गाण्यावर ती नाचत आहे. तर राम कपूर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. गौतमीचा कॉमेडी डान्स बघून दोघंही नंतर हसतात. तर व्हिडिओच्या शेवटी राम म्हणतो आता हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जाईल. खरंच राम व्हिडिओ इन्स्टाग्रावर पोस्ट करतो. याला त्याने 'नौटंकी पहा' असं कॅप्शनही दिलं आहे.

रामने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर गौतमीची संतापलेली प्रतिक्रिया आली आहे. या व्हिडिओसाठी तुला ब्लॉक करण्यात येईल असं तिने लिहिलं आहे. सोबतच रागाचे इमोजीही पोस्ट केले आहेत. 

गौतमी कपूर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'घर एक मंदिर' या मालिकेत राम सोबत काम केले आहे. दोन वर्ष दोघेही या शो मध्ये एकत्र काम करत होते. तर २००३ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलंही आहेत. मुलाचं नाव 'अक्ष' तर मुलीचं नाव 'सिया' असं आहे.

टॅग्स :राम कपूरसोशल मीडिया