Ram Kapoor Threatens The Person Who Mocking Him: अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) लोकप्रिय अभिनेता आहे. 'कसम से' आणि 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या मालिकांमधून राम कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राम कपूर सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
एका युजरनं इन्स्टाग्रामवर राम कपूरवर एक रील बनवलं. ज्यात तो म्हणतो, 'जर राम कपूर हा एक कॉमन मॅन असेल तर त्याला म्हणणार "आम कपूर"'. पुढे तो म्हणतो 'जर राम कपूर ड्रंक(दारू पिलेला) असेल तर त्याला म्हणणार 'जाम कपूर'". असेच विनोद संबंधित युजर विविध परिस्थितीमध्ये राम कपूरला काय म्हणार याबद्दल करताना दिसला. हा व्हिडीओ राम कपूरनं आपल्या इन्स्टावर पोस्ट केलाय. ज्यात राम कपूरने संबंधित युजरला विनोदी पद्धतीने इशारा दिला.
राम कपूरनं लिहलं, "तुमच्याकडे खूप वेळ आहे हे स्पष्ट आहे... नोकरी करा!! पुढच्या वेळी मी तुम्हाला भेटेन तेव्हा तुम्हाला एक चमाट मारेन!! ... हा हा हा हा... खूप मजेदार, पण मला हे मान्य करावेच लागेल". अभिनेत्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "जेव्हा राम कपूर देखणा दिसतो... चार्म कपूर!", "जेव्हा राम कपूर कूल दिसतो, तेव्हा तो क्लॉम कपूर" अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या.
राम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्याची जिओ हॉटस्टारवर 'मिस्त्री' ही सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजचं कथानक राम कपूरनं साकारलेलं पात्र अरमान मिस्त्री भोवती फिरतं. जो एक हुशार गुप्तहेर आहे. पण, गुन्हे विभागातून तो निलंबित झालेला आहे. राम कपूरनं मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्यानं आपला ठसा उमटवला आहे. त्यानं तो 'मेरे डॅड की मारूती', 'कुछ तो लोचा है', 'बार बार देखो', 'थप्पड', 'गोलमाल रिटर्न्स' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही तो झळकला आहे.