Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4 : ‘अंड्याची भुर्जी अन् राखीची मर्जी..चालणारच!’; बिग बॅास मराठीच्या घरात एन्टरटेन्मेंटचा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 08:58 IST

'बिग बॉस मराठी सिझन ४' च्या प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज मिळालं आहे. प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन होणार आहे. बॉलिवुडची ड्रामा क्वीन 'राखी सावंत'ची मराठी बिग बॉस मध्ये एंट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी सिझन ४' च्या प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज मिळालं आहे. प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन होणार आहे. बॉलिवुडची ड्रामा क्वीन 'राखी सावंत'चीमराठी बिग बॉस मध्ये एंट्री झाली आहे. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये कॉमेडीचा धमाका बघायला मिळणार आहे. राखी आणि इतर ३ जणांची बिग बॉस च्या घरात 'वाईल्ड कार्ड' एंट्री झाली आहे.

अभिनेत्री राखी सावंत,‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम, तर ‘बिग बॉस मराठी’चे आधीच्या सीझनमधील स्पर्धक आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ यांनी वाईल्ड म्हणून घरात प्रवेश केला आहे. आता या चौघांमुळे घरातील स्पर्धकांचे आव्हान आणखीनच वाढले आहे. 

बिग बॉसच्या घरात रोजचा ड्रामा तर सुरुच आहे. मात्र राखीच्या येण्याने आता आणखीनच धमाल बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. 'अंड्याची भुर्जी आणि राखीची मर्जी चालणारच !' अशा धमाकेदार डायलॉगनेच तिने सुरुवात केली आहे. या भागात समृद्धी जाधव घराबाहेर पडली असुन आता ४ चॅलेंजर्सने घरात प्रवेश केला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीराखी सावंतमराठीमराठी अभिनेता