Join us

Rakhi Sawant :'उर्फी की मां का बड्डे!', राखी सावंतचा बर्थडेला नखरे पाहून लोकांनी केलं तिला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 15:05 IST

ड्रामा क्वीन राखा सावंत चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. राखी आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

ड्रामा क्वीन राखा सावंत कायम चर्चेत असते. राखी आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदिल खान आणि पापाराझीसोबत केक कापून बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसतेय.  आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

राखी सावंत (Rakhi Sawant) अलिकडेच दुबईत गेली होती. तिथून तिचं एकाहून एक मजेशीर व्हिडिओ समोर आलं. एका व्हिडीओमध्ये ती सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत डान्स करताना दिसली होती. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती केक कापताना दिसत आहे. राखीच्या समोर आदिलनं वेगवेगळं केक ठेवले आहेत. राखी मेणबत्तीला फूंक मारत बॉयफ्रेंड आदिलसोबत केक कट करताना दिसतेय. यादरम्यान राखी भावूक होते आदिला मिठी मारताना दिसतेय.  

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल एकाने तर म्हटले – उर्फीच्या मोठ्या आईचा वाढदिवस. एका यूजरने लिहिले - कोणाचा वाढदिवस आहे, राखीचा की सुनीताचा? त्याचे असे झाले की, विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने हैप्पी बर्थडे टू यू सुनीता हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे. यावरही लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 

 

टॅग्स :राखी सावंतटिव्ही कलाकारट्रोल